सोशल मीडिया सर्वात प्रभावी माध्यम - महेश म्हात्रे
पुणे- लोकसभा,विधानसभा निवडणुकीपासून ग्रामपंचायत निवडणुकीपर्यत सोशल मीडिया प्रभावी माध्यम ठरत आहे.त्यामुळे सर्व राजकीय पक्ष आणि नेते सोशल मीडियाकडे वळले आहेत.यातून तरूणांना रोजगार आणि उत्पन्नाचे साधन मिळाले आहे,असे मत आयबीएन लोकमतचे व्यवस्थापकीय कार्यकारी संपादक आणि डीजिटल संपादक महेश म्हात्रे यांनी व्यक्त केले.
पुण्यात कॅलिडस मीडिया अॅन्ड आर्टस् अकॅडमीच्या वतीने रविवारी डिजिटल मीडियावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी ते बोलत होते.महाराष्ट्र लाइव्हचे संपादक सुनील ढेेपे,झी 24 तासचे डिजिटल संपादक प्रशांत जाधव,अकॅडमीचे संचालक पंकज इंगोले आदी यावेळी उपस्थित होते.
प्रिंट आणि टीव्ही मीडियापेक्षा सोशल मीडिया प्रभावी माध्यम ठरत असल्याने सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला होता. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत डॉनल्ड ट्रम्प यांनीही सोशल मीडिया हायजॅक केला होता.त्यामुळेच सोशल मीडियापासून दूर असणारे पक्ष आणि नेते सोशल मीडियावर अॅक्टीव्ह झाले आहेत,असेही म्हात्रे म्हणाले.आजचा तरूण हा आठवड्याची आकडेवारी पाहिली तर दोन तास वृत्रपत्र,चार तास टीव्ही तर 28 तास सोशल मीडियावर घालवत आहे.मात्र या अभासी विश्वात किती तास सोशल मीडियावर घालावयाची याचा विचार व्हावा असेही ते म्हणाले.डिजिटल मीडिया व्यवसाय म्हणून करीत असताना आपल्याजवळ बिझनेस मॉडेल तयार पाहिजे,असेही ते म्हणाले.
सकाळच्या सत्रात सकाळ डिजिटलचे संपादक सम्राट फडणीस यांनी,डिजिटल मीडियात कश्याप्रकारे क्रांतीकारक बदल झाले तसेच डायलप इंटरनेट कनेक्शनपासून फोरजी इंटरनेटचा प्रवास तसेच भारतात किती लोक इंटरनेट वापरतात याबाबतची माहिती आकडेवारीसह स्पष्ट केली.त्यानंतर महाराष्ट्र लाइव्हचे संपादक सुुनील ढेपे यांनी बेबसाईट आणि ईपेपर कसा अपलोड करतात,सोशल मीडियाच्या लिंक्स बेबसाईटवर अपलोड कश्या कराव्यात याचे प्रात्यक्षिक दाखवले.त्यानंतर झी 24 तासचे डिजिटल संपादक प्रशांत जाधव यांनी,वेबसाईला जाहिराती मिळण्याचे स्रोत आणि आर्थिक गणित याचे विवेचन केले.शेवटी मुंबई सकाळच्या रिर्पाटर हर्षदा परब यांंनी फेसबुक लाइव्हचे प्रात्यक्षिक दाखवले.शेवटी कार्यशाळेस उपस्थित प्रक्षिणार्थींना महेश म्हात्रे यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
या एकदिवसीय कार्यशाळेस जवळपास दिडशे जणांनी नोंदणी केली होती मात्र कॅलिडसच्या वातानुकूलित हॉलची क्षमता कमी असल्याने केवळ 50 जणांना प्रवेश देण्यात आला होता.कार्यशाळेस लाभलेला प्रतिसाद पाहता दिवाळीनंतर याचडिजिटल मीडिया विषयावर पुन्हा एकदा कार्यशाळा आयोजित करण्यात येईल,त्यात काही नव्या पाहुण्यांना निमंत्रित करण्यात येईल,असे कॅलिडस अकॅडमीचे पंकज इंगोले यांनी सांगितलेे.
Comments
Post a Comment