चंगळवाद आणि भारतीय सामाजिक व्यवस्थेच वाटोळ.
समाज व्यवस्थेमध्ये आपण वावरताना काही घटकांचे आणि व्यवस्थेचे आपण पालन केले तर रूढी परंपरा जपल्या तर येणाऱ्या पिढीला आपल्या सणाचे महत्त्व अधोरेखित होऊन येणाऱ्या नवीन पिढीला त्याचा बोध होऊन सामाजिक बांधिलकी अखंडित राहून समाज व्यवस्थेमध्ये आपण चांगले योगदान तरुण पिढीचे राहील. चंगळवादी नवीन आयटी उद्योगामुळे दिवसभर काम रात्रभर काम शनिवार ,रविवार आउटिंग असा फेऱ्यात अडकलेला तरुण चंगळवादाच्या मोठ्या इन्फानाईट लूप मध्ये सापडलेला आहे या सर्वांचा नवीन तरुण पिढीवर खूप गंभीर परिणाम जाणवायला सुरुवात झाली आहे. नवीन लग्न झालेली जोडपी या परिणामाची भक्षस्थानी जाताना दिसतात. चौका चौकात आय वी एफ डॉक्टरांचे दवाखाने हे हे चंगाळवादी संस्कृतीचं दुष्परिणाम म्हणावे लागतील. रात्री काम दिवसभर झोप यामुळे व्यायाम हा विसरून गेलेला प्रकार आपल्याला दिसत आहे त्यामुळे अर्धांग वायू चे रुग्ण संख्या भरपूर वाढलेली आहे. शेतीप्रधान अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती ही आता आधुनिक यंत्रसामग्री वापरून केली जाते त्यामुळे शारिरीक कष्ट याचं प्रमाण खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळे माणसाच्या जीवनपद्धतीत अमुलाग्र बदल होत आहेत. फाई...