चंगळवाद आणि भारतीय सामाजिक व्यवस्थेच वाटोळ.
समाज व्यवस्थेमध्ये आपण वावरताना काही घटकांचे आणि व्यवस्थेचे आपण पालन केले तर रूढी परंपरा जपल्या तर येणाऱ्या पिढीला आपल्या सणाचे महत्त्व अधोरेखित होऊन येणाऱ्या नवीन पिढीला त्याचा बोध होऊन सामाजिक बांधिलकी अखंडित राहून समाज व्यवस्थेमध्ये आपण चांगले योगदान तरुण पिढीचे राहील.
चंगळवादी नवीन आयटी उद्योगामुळे दिवसभर काम रात्रभर काम शनिवार ,रविवार आउटिंग असा फेऱ्यात अडकलेला तरुण चंगळवादाच्या मोठ्या इन्फानाईट लूप मध्ये सापडलेला आहे या सर्वांचा नवीन तरुण पिढीवर खूप गंभीर परिणाम जाणवायला सुरुवात झाली आहे.
नवीन लग्न झालेली जोडपी या परिणामाची भक्षस्थानी जाताना दिसतात. चौका चौकात आय वी एफ डॉक्टरांचे दवाखाने हे हे चंगाळवादी संस्कृतीचं दुष्परिणाम म्हणावे लागतील. रात्री काम दिवसभर झोप यामुळे व्यायाम हा विसरून गेलेला प्रकार आपल्याला दिसत आहे त्यामुळे अर्धांग वायू चे रुग्ण संख्या भरपूर वाढलेली आहे.
शेतीप्रधान अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती ही आता आधुनिक यंत्रसामग्री वापरून केली जाते त्यामुळे शारिरीक कष्ट याचं प्रमाण खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळे माणसाच्या जीवनपद्धतीत अमुलाग्र बदल होत आहेत.
फाईव्हच्या जमान्यात रील व्हिडिओ यांचा मोठ्या प्रमाणावर तरुणावर परिणाम होताना दिसत आहे स्क्रीन टाईम वाढल्यामुळे डोळ्याचे असंख्य व्याधी तरुणांना जडत आहे.
पूर्वी सकाळी उठून योगा, प्राणयाम , सूर्यनमस्कार असे तालमीत जाऊन दोन तास व्यायाम केल्यावर पौष्टिक दूध किंवा थंडाई पिल्यावर लोक आपापल्या कामावर जात असे आता जग बदलला आहे व्यायामाचे प्रकार बदलले आहेत.
व्यायाम आता जिम मध्ये चार भिंतीच्या आत मध्ये एसी मध्ये केला जातो त्यामुळे निसर्गाशी संवाद तुटला आहे नवीन पाश्चात्त्य संस्कृतीमुळे भारतीय संस्कृतीचं वाटोळ झाला आहे भारतीय सण उत्सव आता मोठे डीजे लावून साजरी करण्याची प्रथा चौका चौकात आली आहे त्यामुळे तरुण कर्णबधिर होऊन नशेच्या आहारी गेला आहे.
पूर्वी सण उत्सवात लेझीम ढोल वाजून कार्यक्रम आखीव रेखीव पद्धतीने चौकात साजरा करण्याची प्रथा ही आता संपुष्टात आली आहे त्यामुळे भारतीय संस्कृतीवर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव झाला आणि भारतीय संस्कृती आता म्युझियम मध्ये बघायला मिळेल असं वाटतंय.
याबद्दल आपल्याला काय वाटतं आणि ते लिहा.
आपला सारंग मोकाटे पुणे.+91-9890220001
Comments
Post a Comment