कोकणातील शिमगा आणि पालखी उत्सव
दररोज सकाळी लोकलचा प्रवास करून आपल्या कामावर गेलेला कोकणी चाकरमानी जेव्हा आपल्या गावाकडे शिमगा आणि पालखीसाठी मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो तेव्हा शिमगा उत्सवाचं महत्व काय असतं हे वेगळं सांगायला नको.
शिमग्याला कोळी बांधव आपापल्या होळीला हार फुले लावून त्याची आरती करून अग्नी दिला जातो त्यानंतर सुवासिनी महिला त्या अग्निभोवती महाप्रसाद म्हणून नैवेद्य अग्नीला अर्पण करून अगदी देवाचे आभार मानण्याचं सण म्हणजे होळी.
होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमीचा आनंद बालगोपाळ घेत असतात त्याचबरोबर थोर मोठेपण आपापल्या मित्र-मैत्रिणींना रंग लावून रंगपंचमीची स्नेह वृद्धिंगत होत असतो.
होळीच्या दिवसापासून गाव देवाची पालखी प्रत्येक गावातील सदस्य आणि वाड्यावर गाव देवाची भक्ती भावाने पूजा, आरती त्यानंतर प्रसाद असा ठरलेला कार्यक्रम प्रत्येक भक्ताच्या घरी नियोजित केला जातो त्यामुळे वातावरणात प्रसन्नता येते आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात त्यातून कोकण संस्कृतीचं दर्शन जगाला होतं.
पालखीच्या निमित्ताने चाकरमाने आपापल्या गाव देवाची मनोभावे प्रार्थना करतात त्यामुळे आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊन भविष्यात आपल्या समृद्ध कोकणात ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीला देऊन पालखी नाचत गात मोठ्या आनंदाने साजरा करून ऋणानुबंध द्विगुणित होत आहेत.
Comments
Post a Comment