Posts

Showing posts from 2021

गोरगरीब काबाड कष्टकरी माणसांच्या घरांची वस्ती,बिल्डर-माननीय-प्रशासन मनपा आली मस्ती.

गोरगरीब काबाड कष्टकरी माणसांच्या घरांची वस्ती, बिल्डर-माननीय-प्रशासन मनपा आली मस्ती. भारताच्या सुसंस्कृतीत  वटपौर्णिमेच्या दिवशी आंबील ओढा या ठिकाणी झालेल्या कारवाईचा जाहीर निषेध करून लेखाला सुरुवात करत आहे.  गंगेचा उगम गंगोत्री याठिकाणी झाला असला तरी नदी गंगा मुळे जमीन  सुपीक होऊन सर्व पिक घेतल्यामुळे मानवाच्या प्रगतीमध्ये गंगेला अमूल्य महत्त्व आहे. अनेक उद्योगधंदे, ऊर्जा प्रकल्प पाणी उपलब्ध असल्यामुळे उभारले आणि लोकवस्ती ही वाढली. पुणे हे मुळा, मुठा नदीवर वसलेले शहर आहे. पाणी,ऊर्जा आणि सुपीक जमीन असल्यामुळे पुणे शहराची भरभराटी झाली. शहरीकरण वाढल्यामुळे पुण्यात दिवसेंदिवस राहण्याचा प्रश्न कठीण होत गेला लोकांना मिळेल तिथं आसरा घेऊ लागले. त्यातून नंतर भाईगिरी,वसाहतवाद,भांडण निर्माण झाले. आंबील ओढ्याचा पाच एकरचा भूखंड बाजार भाव तीनशे कोटी रुपये असल्यामुळे याकडे सर्वांच्या नजरा वळल्या. त्याच्या शेजारून ओढा वाहत असल्यामुळे त्याला आंबील ओढा असे नामकरण करण्यात आले. कष्टकऱ्यांची वसाहत असलेल्या या ठिकाणी एस आर ए प्रकल्प उभा करून मोठा फायदा कसा घेता येईल यादृष्टीने सर्व बिल्डर मंड...