गोरगरीब काबाड कष्टकरी माणसांच्या घरांची वस्ती,बिल्डर-माननीय-प्रशासन मनपा आली मस्ती.
गोरगरीब काबाड कष्टकरी माणसांच्या घरांची वस्ती,
बिल्डर-माननीय-प्रशासन मनपा आली मस्ती.
भारताच्या सुसंस्कृतीत वटपौर्णिमेच्या दिवशी आंबील ओढा या ठिकाणी झालेल्या कारवाईचा जाहीर निषेध करून लेखाला सुरुवात करत आहे.
गंगेचा उगम गंगोत्री याठिकाणी झाला असला तरी नदी गंगा मुळे जमीन सुपीक होऊन सर्व पिक घेतल्यामुळे मानवाच्या प्रगतीमध्ये गंगेला अमूल्य महत्त्व आहे. अनेक उद्योगधंदे, ऊर्जा प्रकल्प पाणी उपलब्ध असल्यामुळे उभारले आणि लोकवस्ती ही वाढली.
पुणे हे मुळा, मुठा नदीवर वसलेले शहर आहे. पाणी,ऊर्जा आणि सुपीक जमीन असल्यामुळे पुणे शहराची भरभराटी झाली.
शहरीकरण वाढल्यामुळे पुण्यात दिवसेंदिवस राहण्याचा प्रश्न कठीण होत गेला लोकांना मिळेल तिथं आसरा घेऊ लागले. त्यातून नंतर भाईगिरी,वसाहतवाद,भांडण निर्माण झाले.
आंबील ओढ्याचा पाच एकरचा भूखंड बाजार भाव तीनशे कोटी रुपये असल्यामुळे याकडे सर्वांच्या नजरा वळल्या. त्याच्या शेजारून ओढा वाहत असल्यामुळे त्याला आंबील ओढा असे नामकरण करण्यात आले.
कष्टकऱ्यांची वसाहत असलेल्या या ठिकाणी एस आर ए प्रकल्प उभा करून मोठा फायदा कसा घेता येईल यादृष्टीने सर्व बिल्डर मंडळी कामाला लागली आणि त्यातून वैमनस्य वाढत गेले. गोरगरीब कष्टकरी जनता ही मात्र हतबल झाली.
ज्यांच्या हातात महानगरपालिकेची सत्ता दिली तेच बिल्डरबरोबर वाटाघाटी करून सामान्य लोकांना त्रास देऊ लागले. कधी धोकादायक तर कधी अतिक्रमणाच्या नोटीस येऊ लागल्या. सामान्य नागरिकांचा मानसिक खच्चीकरण करून त्यांना कसं फुकटात पळून लावता येईल याचा प्रयत्न वर्षानुवर्ष होत आहे.
भर पावसात बुलडोझर लावून गोरगरिबांची घरं पाडल्यामुळे लोकांमध्ये आक्रोश निर्माण झाला. सुखवस्तू सामान शिफ्टिंग करताना चोरीला गेल्यामुळे त्यांची वाताहत झाली. महिला,मुली,बालक खूप रडत होती. पण प्रशासनाला काही देणं घेणं नव्हतं.
पुण्यासारख्या शहरात वटपौर्णिमेच्या दिवशी हे झालं हे खूप चुकीचा आहे. विनोबा भावे भूदान चळवळीतून लाख एकर जागा भूमिहीन शेतमजूर, कामगार, बहुजन समाज समाजासाठी दिल्यामुळे त्यांना सरकारने भारतरत्न पुरस्कार दिला आहे.
'कर लो दुनिया मुठ्ठी में' च्या नादात देश भांडवलदारांच्या हातात जात आहे याचं एक जिवंत उदाहरण आपल्यासमोर आहे. मूठभर भांडवलदार देशाचे कल्याण करतील का हे विचारणारी जनता तेवढी सुज्ञ हवी.
Comments
Post a Comment