पत्रकार ते रिपब्लिक टीव्ही...
अर्णब गोस्वामी यांचा 'रिपब्लिक टीव्ही' ऑन एअर
आक्रमक आणि धारदार सूत्रसंचालनाच्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी शनिवारी माध्यमविश्वात पुनरागमन केले. अर्णब यांची बहुचर्चित ‘रिपब्लिक टीव्ही’ ही वृत्तवाहिनी आजपासून सुरू झाली. गेल्या वर्षभरापासून माध्यमविश्वात अर्णब यांच्या ‘रिपब्लिक टीव्ही’ची प्रचंड चर्चा सुरू होती. अर्णब गोस्वामी यांनी गेल्यावर्षी ‘टाईम्स नाऊ’च्या मुख्य संपादक पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी ‘रिपब्लिक टीव्ही’ ही वृत्तवाहिनी सुरू करण्याबद्दल सुतोवाच केले होते. अखेर आजपासून ही वृत्तवाहिनी सुरू झाली.
Comments
Post a Comment