साध्या-सभ्य मुलाशी लग्न करा.
लग्नाच्या वयात आलेल्या मुलींसाठी एक महत्त्वाचा सल्ला आहे. जर तुम्ही लाईफमध्ये सेकंड इनिंगचा विचार करत आहात तर थांबा. स्टाईलिश आणि स्मार्ट मुलाच्या मागे जाऊ नका तर साधा सरळ मुलगा शोधा. हा सल्ला कोणी सर्वसामान्य स्त्रीने दिला नसून फेसबुकची मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीओओ शेरील सॅण्डबर्ग यांनी दिला आहे. फेसबुकच्या आजच्या यशात शेरीलचा वाटा सिंहीणीचा आहेच. शेरील अनेक ठिकाणी मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून बोलते, जगण्याचा एक वेगळा आणि आनंदी दृष्टीकोन जगभरातल्या माणसांशी शेअर करते.
अलिकडेच फिनान्शियल टाईम्स वृत्तपत्राला अमेरिकेतच दिलेल्या मुलाखतीत ती मोकळेपणाने बोलत होती. मुलींनी लग्नाचा निर्णय घेताना फार काळजीपूर्वक विचार करुन ‘the good guy’ शोधायला हवा. जगण्याची लढाई स्वत:च्या हिमतीवर जगणाऱ्या आणि आयुष्याच्या प्लॅन बीचा जिद्दीनं, आनंदानं स्वीकार करणाऱ्या शेरील सॅण्डबर्गचा हा सल्ला आहे.
नात्यात, विशेषत: लग्न करताना एखाद्या मुलीनं काय विचार करायला हवा असा प्रश्न विचारला असता शेरील सांगते, पहायला हवं की हा माणूस चांगला आहे की नाही, जन्मभर आपली सोबत करताना आपल्या आनंदात आनंद मानेल की नाही.’ सौजन्य India
Comments
Post a Comment